आघाडीचा महामोर्चा : मोर्च्यात आलेल्या महिलांना माहितीच नाही कशासाठी आलोत?

Admin
1 Min Read

मुंबईत आज महाविकास आघाडीच्या महामोर्च्याला सुरुवात झाली आहे. भाजपदेखील या मोर्चाला प्रत्यूत्तर म्हणून मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघांत माफी मांगो आंदोलन करत आहे. अशातच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मोर्चाला महिलांचाही सहभाग दिसत आहे.या महिलांशी माध्यमांच्या प्रतिनिधींनी संवाद साधला.

यावेळी या महिलांनी हा मोर्चा कशासाठी काढण्यात येणार आहे याची माहिती नसल्याचे सांगितले. तसेच तुम्हाला आमच्यासोबत यायचे आहे, असे सांगितले गेले. राजूभाई आम्हाला इथे घेऊन आला आहे, असे या महिलांनी सांगितले.
या महिलांच्या हाती मोर्चाचे बॅनर होते, त्यावर विचारले असता काहीनी आपण अंगठाछाप असल्याचे सांगितले. दरम्यान, महाविकास आघाडीकडून शिंदे सरकारला लक्ष्य करणारा हल्लाबोल मोर्चा एकीकडे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या मोर्चाला प्रत्त्युत्तर देण्यासाठी भाजपकडून माफी मांगो आंदोलन केले जात आहे. हल्लाबोल मोर्चातून महाविकास आघाडी शक्तिप्रदर्शन करत आहे.

Share This Article