खेळ
टी-20 मध्ये लाजिरवाणा विक्रम, अवघ्या 15 धावांवर संघ ऑलआऊट
क्रिकेटच्या टी-20 फॉरमॅटमध्ये अनेक रेकॉर्ड्स होताना आपण पाहतो. या फॉरमॅटमध्ये असे काही रेकॉर्ड्स झाले आहेत ज्यांचा कदाचित कोणी विचारही केला नसेल. अशाही काही घटना घडल्या आहेत ज्यामुळे काही प्लेअर्सने आपला सर्वात वाईट परफॉर्मन्स दाखवला आहे.आता असाच एक परफॉर्मन्स समोर आला आहे जेथे संपूर्ण टीम अवघ्या 15 रन्सवर आऊट झाली. BBL म्हणजेच बिग बॅग लीगमध्ये एडिलेड स्ट्रायकर आणि सिडनी थंडर्स यांच्यात मॅच झाली.
ही मॅच एडिलेड स्ट्रायकरच्या टीमसाठी ऐतिहासिक ठरली तर दुसरीकडे सिडनी थंडर्ससाठी लाजिरवाणा दिवस ठरला. कारण या मॅचमध्ये सिडनी थंडर्सची संपूर्ण टीम 15 रन्सवर माघारी परतली.
एडिलेड स्ट्रायकरच्या टीमसमोर एकाही बॅट्समनला मोठा स्कोअर करता आला नाही. एडिलेड स्ट्रायकरच्या टीमने सर्वप्रथम बॅटिंग करत 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट्स गमावत 139 रन्स केल्या.
एडिलेड स्ट्रायकरच्या टीमकडून क्रिस लिन याने 36 रन्सची इनिंग खेळली तर कॉलिन डी ग्रँडहोम याने 33 रन्सची इनिंग खेळली. त्यानंतर हे आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या सिडनी थंडर्सच्या बॅट्समनला एडिलेड स्ट्रायकरच्या बॉलर्सने एक-एक करुन माघारी धाडलं.