मनोरंजन

कपाळावर टिकली, लाल भडक लिपस्टिक अन् दागिने

सध्या सोशल मीडियावर एका फोटोची चर्चा रंगली आहे. अनेकांनी कमेंट करत ‘लीजेंड’ आणि ‘शानदार’ अशा कमेंट केल्या आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘हड्डी’ चित्रपटाची घोषणा निर्मात्यांनी धमाकेदार पद्धतीने केली आहे.

चित्रपटाच्या घोषणेसोबतच निर्मात्यांनी चित्रपटातील नवाजुद्दीनची पहिली झलक शेअर केली होती. चित्रपटात तो एका ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे. नवाजने एकदा चित्रपटातील लूकमधील फोटो शेअर केला आहे.
त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवाजुद्दीनने आगामी चित्रपटातील फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्याच्या कपाळावर मोठी लाल टिकली, ओठांना लिपस्टिक, अंगावर लाल रंगाची साडी दिसत आहे. फोटोमध्ये तो एका व्यक्तीकडे पाहून हसताना दिसत आहे. नवाजने हा फोटो शेअर करत बॅकग्राऊंडला मेरे हमसफर हे गाणे टाकले आहे.

Related Articles

Back to top button