महाराष्ट्र
मातोश्रीवरुन बाळासाहेबांचा एक आदेश अन्…

बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे आज निधन झाले. राज्यात आणि केंद्रात अनेक पदे भूषवणाऱ्या शिवसेनेच्या जोशी सरांचे आयुष्य संघर्षमय राहिले. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे जोशी हे शिवसेनेकडे खेचले गेले.
1967 पासून त्यांनी अधिकृतपणे शिवसैनिक म्हणून काम सुरू केले. पक्षाचे काम करत असताना ते पहिल्यांदा मुंबई महापालिकेचे नगरसेवक झाले. दोन वेळा ते नगरसेवक राहिले.
नंतर सलग तीन वेळा ते विधान परिषदचे आमदार राहिले. पुढे १९७६ मध्ये ते मुंबई महापालिकेचे महापौर झाले. पुन्हा त्यांची पाऊले राज्याच्या राजकारणात पडली आणि ते आमदार म्हणून विधानसभेत गेले.
पुढे ते १९९०-९१ या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले. महाराष्ट्रात १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युतीला बहुमत मिळाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मुख्यमंत्री केले. ते १९९९ पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.
नंतर त्यांना एका प्रकरणामुळे राजीनामा द्यावा लागला. मातोश्रीवरुन बाळासाहेब ठाकरेंचा एक आदेश येताच मनोहर जोशींनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.