आरोग्य

थंडीत गरम पाण्याने अंघोळ करणे हानीकारकच

थंडीच्या दिवसात तुम्ही जेव्हा गरम पाण्याने जास्त वेळ आंघोळ करता तेव्हा त्याचा तुमच्या प्रजनन क्षमतेवर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ केल्यास तुमच्या प्रजनन क्षमतेवर त्याचा प्रभाव पडतो. त्यामुळे तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करताना ती कमीत कमी वेळात करण्याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या केसांना गरम पाण्याचा मोठा फटका बसतो. 

कारण त्यामुळे केसांमधील आर्द्रता कमी होते. तुम्हीदेखील हा अनुभव घेतला असेल की हिवाळ्यात आपले केस कोरडे होतात. आपल्या डोक्यावरील त्वचा कोरडी पडते. परिणामी केसांमध्ये कोंडा होण्याचे प्रमाण वाढते. शिवाय केस रुक्ष झाल्यामुळे केस गळण्याचे प्रमाण वाढते.
हिवाळ्यात त्वचेच्या समस्या सर्वांनाच उद्भवतात. त्वचा कोरडी पडणे, फुटणे, खाज येणे यासारख्या समस्यांना आपण दर हिवाळ्यात तोंड देत असतो. त्यात तुम्ही जर गरम पाण्याने आंघोळ करत असाल तर त्याचा फटका तुमच्या त्वचेला बसतो. परिणामी तुमच्या त्वचेचे आणखी नुकसान होते. कारण गरम पाण्यामुळे त्वचेची आर्द्रता आणि मुलायमपणा कमी होतो. त्यामुळे त्वचा कोरडी पडते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button