राजकीय

शिवरायांचा अपमान करणारे मोदींच्या शेजारी बसलेत, महाराष्ट्राने काय समजायचं?

  1. राज्यपालांनी महाराजांचा अपमान केला. तेच राज्यपाल आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यासपीठावर बसलेले दिसतात, मग आम्ही काय समजायचे, असा सवाल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. राज्यपाल यांनी शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया आल्या होत्या.
  2. यावरूनच आज ठाकरेंनी भाजपवर आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला. ठाण्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आज उद्धव यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी उद्धव यांनी माध्यमांशी संवाद साधला.
  3. ते म्हणाले की, महाराष्ट्राची जी अस्मिता आहे. तसेच शाहु, फुले, आंबेडकर आणि छत्रपतींचा महाराष्ट्र आहे असे आपण म्हणतो. पण त्याच महापुरूषांचा अपमान करणारा माणूस राज्यपाल पदावर बसलेला असेल आणि तोच माणूस आज मोदींच्या कार्यक्रमात असेल, तर महाराष्ट्राने नमके काय समजायचे, असा सवाल उद्धव यांनी उपस्थित केला.

Related Articles

Back to top button