मनोरंजन

आई-वडिलांचे नाव खराब केले

बॉलिवूडची अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. आता कामातून ब्रेक घेत जान्हवी सध्या मालदीवला रवाना झाली आहे. मालदीवच्या वॉटर विलामधील सुंदर फोटो शेअर करत ती आपल्या चाहत्यांना देखील मालदीव सफर घडवत आहे.

नुकतेच जान्हवीने तिचे बिकिनी लूकमधील फोटो शेअर करत इंटरनेटचा पारा वाढवला आहे. जान्हवीने या फोटोंमध्ये हिरव्या फ्लुरोसंट रंगाची बिकिनी परिधान केली आहे. नियॉन रंगावर जान्हवीचं विशेष प्रेम आहे. अनेकदा ती बीच लूकसाठी नियॉन रंगाला प्राधान्य देताना दिसली आहे.
काही लोकांना जान्हवीचा हा लूक आवडला नाही. जान्हवीच्या फोटोंवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले, तुम्ही लोक प्रसिद्धीसाठी असे काम का करता? आपले नाव बनवण्याच्या प्रक्रियेत आपण आपल्या आई-वडिलांचं नाव खराब करत आहात.

Related Articles

Back to top button