समृध्दी’च्या उद्घाटनावेळी मोदींचा मास्टर स्ट्रोक

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचे आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी या 529 किलोमीटर अंतराचा रस्ता सर्वसामान्यांसाठी आता खुला झाला आहे.दरम्यान रविवारी आपल्या दौर्यात मोदींनी लगावलेल्या मास्टर स्ट्रोकमुळे त्यांनी राज्यातील जनतेची मने जिंकली.
या विकास कामांप्रसंगी छायाचित्रकार मोदींची छबे टीपण्यासाठी धडपड करीत होते. दरम्यान मोदींचा फोटो व्यवस्थित यावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोडेसे बाजूला झाले. मात्र, मोदी यांच्या नजरेत ही गोष्ट चटकन लक्षात आली आणि त्यांनी शिंदे यांना जवळ बोलावून त्यांच्यासोबत फोटो शूट केले.
तसेच शिंदे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. दरम्यान वायफळ टोळ नाक्यावर समृध्दी महामार्गाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी लेझीम आणि ढोल पथक उपस्थित होते. दरम्यान मोदी हे या ढोल पथकाच्या जवळ गेले. इतकेच नव्हे तर ढोल पथकातील एका वादकाकडून काठी घेऊन त्यांनी ढोल वाजवण्याचा मनमुराद आनंद लुटला.
मोदी यांच्या या कृतीने ढोल पथकातील कलाकारांचा उत्साह दणक्यात वाढला. पंतप्रधान मोदी ढोल वाजवण्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. त्यांच्या या कृतीने सर्वांची मने जिंकली.