क्राईम
श्रद्धा हत्याकांड प्रकरणात पुन्हा मोठा ट्विस्ट

- श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला आहे. हत्येच्या थरारक घटनेनंतर तपासात आणि चौकशीत बेजबाबदारपणा दाखवत दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहे. मुंबईतील तुलिंज आणि मानिकपूर ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
- श्रद्धाचे वडील विकास यांनी पोलिसांच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबतचा आदेश काढला आहे.
आरोपी आफताबने मारहाण केल्यानंतर श्रद्धाने तुलिंज आणि मानिकपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. परंतु पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळंच पुढील संतापजनक प्रकार घडल्याचं बोललं जात आहे. हा मुद्दा श्रद्धाचे वडील विकास यांनी उपस्थित करत पोलिसांच्या चौकशीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर आता या प्रकरणातील बेजबाबदार पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.