महाराष्ट्र

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक, ११ पोलीस कर्मचारी सस्पेंड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवड येथील एका भेटीदरम्यान शाईफेक करण्यात आली होती.
दरम्यान, हल्ला करणाऱ्यांवर कुठलीही कारवाई करण्यात येऊ नये, असे पाटील यांनी सांगूनही पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पाटील यांच्या सुरक्षेत कसूर केल्या प्रकरणी ११ पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. 

यात ८ पोलिस कर्मचारी तर ३ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.  पाटील हे पिंपरी-चिंचवड येथील एका ठिकाणी गेले असता त्यांच्यावर मनोज भास्कर घरबडे ( समता सैनिक दल संघटक), धनंजय भाऊसाहेब इजगज (समता सैनिक दल सदस्य) आणि विजय धर्मा ओव्हाळ (वंचित बहुजन आघाडी) यांनी शाईफेक केली होती. या प्रकरणी या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच एका पत्रकाराला अटक झाली आहे. 

Related Articles

Back to top button