हवामान
ब्रेकिंग! सोलापूर @ 10.7 अंश ; गारठा वाढला
सोलापूरसह राज्यातील अनेक भागात गारठा अधिक वाढला आहे आणि अशातच पुणे हवामान विभागाने नुकताच एक अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. गारठा वाढण्यासोबतच राज्यात १५ डिसेंबर पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
त्यामुळे ऐन हिवाळ्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
हवामान खात्याने ११ ते १४ डिसेंबर या कालावधीत राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक, कांदा उत्पादक, गहू उत्पादक यांना मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतमालाचे नुकसान झाल्यानंतर मिळालेली तोकडी नुकसान भरपाई, आणि त्यात पुन्हा ऐन हिवाळ्यात पाऊस तोही शेतमाल हाताशी आलेले असतांना त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. दरम्यान सोलापुरात पारा घसरला आहे. आज 10.7 तापमानाची नोंद झाली आहे.