महाराष्ट्र
आता राज्यातही येणार ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा
- नागपूर येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला येत्या १९ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. तीन वर्षांनंतर हिवाळी अधिवेशन विदर्भात होत असल्याने या अधिवेशनाकडे लक्ष लागले आहे. हे अधिवेशन अनेक मुद्द्यांवरून वादळी ठरण्याची शक्यता आहे. याच अधिवेशनात शिंदे सरकारने लव्ह जिहादविरोधी विधेयक आणण्याची तयारी सुरू केली आहे.
मागील काही काळापासून लव्ह जिहादच्या मुद्द्यावर भाजपच्या अनेक नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात लव्ह जिहादच्या काही घटना घडल्याच्या घटना घडल्याचा दावा भाजपच्या आमदारांकडून केला जात होता. - त्यातच श्रद्धा वालकर या तरुणीची दिल्लीमध्ये तिचा लिव्ह इनमधील पार्टनर आफताब याने केलेल्या हत्येनंतर या मुद्द्यावर चर्चा होत आहे. श्रद्धाची हत्या हा लव्ह जिहादच असल्याचा दावा केला जात आहे. अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी लव्ह जिहादविरोधात कायदा आणण्याची मागणी होत आहे.
या मुद्द्यावर राज्यातील सत्ताधारी असलेल्या शिंदे सरकारने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. लव्ह जिहादविरोधी विधेयक विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये ते सभागृहात मांडले जाण्याची शक्यता आहे. या विधेयकावर आमदार नितेश राणे अधिक अभ्यास करत आहेत.