क्राईम

मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरणात डाॅक्टर CID च्या ताब्यात

  • बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील फरार तीनही आरोपींना मदत करणाऱ्या संशयित आरोपींना एसआयटीने ताब्यात घेतले आहे.
  • धारूरच्या कासारीतून एका डॉक्टरसह दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य फरार आरोपींना पकडण्यासाठी सीआयडी पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवली. आज एसआयटीच्या पथकाने बीडमधून तीन जणांना ताब्यात घेतले. त्यात एक डॉक्टरांचाही समावेश आहे. डॉ. संभाजी वायबसे असे ताब्यात घेतलेल्या डॉक्टरांचे नाव आहे. 
  • आयपीएस बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीने वायबसे यांच्यासह दोघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिघांनी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळेला पळून जाण्यास मदत केल्याचा संशय आहे.
  • दरम्यान, ताब्यात घेतलेल्या तीन संशयित आरोपींची दीड तासपासून कसून चौकशी करण्यात येत आहे. त्यांच्याकडून फरार आरोपींची माहिती घेतली जात असून या चौकशीत अनेक खुलासे होण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे.

Related Articles

Back to top button