- पावसाळ्यात कधी आणि कुठे एखादा सर्प येऊन बसेल याचा नेम नाही. असाच एक प्रकार सोलापुरातील अंत्रोळी नगर परिसरात घडला. अर्जुन नागदेव राहणार बसवेश्वर नगर प्लॉट नंबर २, अंत्रोळी नगर सोलापूर यांना त्यांच्या अपार्टमेंटमध्ये पार्क केलेल्या बजाज चेतक या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये एक सर्प शिरत असल्याचे निदर्शनास आले.
- त्यांनी तात्काळ सोलापूरचे सर्पमित्र रविचंद्र स्वामी यांना फोन कॉल द्वारे या घटनेची खबर दिली. सर्पमित्र रविचंद्र स्वामी व सर्पमित्र भीमसेन लोकरे यांच्या समवेत सहकारी समर्थ निंबर्गी हे त्या ठिकाणी पोहोचून पाहणी केली असता, त्या स्कूटर मध्ये “मांजऱ्या” जातीचा “निमविषारी” सर्प आढळून आला. सर्पमित्रांनी अथक परिश्रमाने व व गाडी रिपेरी करणाऱ्या मेकॅनिक यांच्या मदतीने त्या स्कूटरची डिग्गी खोलून तेथे शिरून व दडून बसलेला “मांजऱ्या” जातीचा “निमविषारी” सर्प अलगदपणे बाहेर काढून सुरक्षित रित्या पकडला. व तेथील रहिवासी नागरिकांना सापाविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली त्याच बरोबर पावसाळ्यात सापांपासून दक्ष राहण्यासाठी उपाययोजनांचे मार्गदर्शन सर्पमित्रांनी केले. त्यानंतर काही वेळातच त्या सर्पास निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले.
सोलापूर! चक्क गाडीत शिरला साप
