महाराष्ट्र

राज्यातील सर्व शाळांसाठी नवीन वेळापत्रक लागू!

  • राज्यातील सर्व शाळांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून एक मोठा बदल करण्यात आला असून राज्य शासनाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. हा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलात येण्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. 16 एप्रिल रोजी शासनाने यासंदर्भातील निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू झाली आहे.
  • या नव्या धोरणाची सुरुवात सध्या फक्त इयत्ता पहिलीपासून करण्यात येणार आहे. म्हणजेच, इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी नव्याने आखलेले अभ्यासक्रम आणि वेळापत्रक यंदाच्या शैक्षणिक वर्षात लागू होणार आहे. यानंतर पुढील वर्षांमध्ये इतर इयत्तांमध्येही टप्प्याटप्प्याने हे धोरण राबवले जाईल.
  • राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यावतीने इयत्ता पहिली आणि दुसरीसाठी नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने अलीकडे जारी केलेल्या परिपत्रकानुसार हे वेळापत्रक सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये लागू होणार आहे.
  • यामध्ये विषयवार तासिकांची स्पष्ट विभागणी करण्यात आली असून गणित, भाषा, पर्यावरण, आरोग्य शिक्षण आणि कलाशिक्षण या विषयांना समप्रमाणात वेळ देण्यात आलेला आहे.
  • शाळांमधील अध्यापन कालावधी सर्वांसाठी एकसमान ठेवण्यात आला असून, परिपाठ, मधली सुट्टी आणि समृद्धीकरण तासिका यामध्ये स्थानिक गरजेनुसार थोडाफार बदल केला जाऊ शकतो. अभ्यासक्रमाच्या विविध पैलूंना योग्य महत्त्व देऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा उद्देश या नव्या आराखड्यातून स्पष्ट दिसतो.
  • नवीन वेळापत्रकानुसार, शैक्षणिक वर्षात एकूण 365 दिवसांपैकी 210 दिवस हे अध्ययन आणि अध्यापनासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यासाठी 35 आठवड्यांचा अभ्यासकाल ठरवण्यात आला आहे. उर्वरित कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Related Articles

Back to top button