ब्रेकिंग! अमेरिकेचा इराणवर घातक बॉम्ब हल्ला

Admin
1 Min Read
  • इस्रायल आणि इराणमधील युद्धाची मोठी धग जगात सुरू असतानाच आता जे युद्ध मिटवण्याच्या गप्पा करत होते त्या अमेरिकेने यात उडी घेतली आहे. अमेरिकेच्या हवाई दलाने फोर्डो, नतान्झ आणि एस्फहान अणुउर्जा केंद्रांवर बॉम्ब हल्ला केला आहे.
  • अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याबाबत माहिती दिली आहे. ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेने शनिवारी रात्री इराणच्या तीन प्रमुख अणुउर्जा केंद्रांवर हल्ला केला आहे. फोर्डो, नतान्झ आणि इस्फहानवर या केंद्रांवर यशस्वी बॉम्ब हल्ला केला आहे. अमेरिकन सैन्याने पूर्ण तयारीने या ठिकाणांवर बॉम्ब टाकले. ज्यामध्ये फोर्डो हे मुख्य लक्ष्य होते.
  • ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिले की, आम्ही इराणमधील फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान येथील तीन अणुस्थळांवर यशस्वी हल्ले केले आहेत. फोर्डोवर बॉम्बचा संपूर्ण पेलोड टाकण्यात आला. हल्ले करुन आमची सर्व लढाऊ विमाने आता इराणी हवाई हद्दीतून सुरक्षितपणे बाहेर पडली आहेत. जगातील इतर कोणत्याही सैन्याकडे ही क्षमता नव्हती. अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याचे हे यश आहे. आता शांततेची वेळ आली आहे.
  •  ट्रम्प यांनी इराणला इशाराही दिला आहे. ते म्हणाले की, अमेरिकन सैन्याने जे केले आहे ते कोणतेही सैन्य करू शकले नसते. जर इराणने शांतता प्रस्थापित केली नाही तर भविष्यात त्यांच्यावर होणारे हल्ले खूप मोठे असतील.
Share This Article