देश - विदेश

ब्रेकिंग! अमेरिकेच्या हल्ल्याने संतापलेल्या इराणचा प्रतिहल्ला

  • इस्रायल आणि इराणमधील युद्धाची मोठी धग जगात सुरू असतानाच आता जे युद्ध मिटवण्याच्या गप्पा करत होते त्या अमेरिकेने यात उडी घेतली आहे. अमेरिकेच्या हवाई दलाने फोर्डो, नतान्झ आणि एस्फहान अणुउर्जा केंद्रांवर बॉम्ब हल्ला केला आहे. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर इराणने आज सकाळी इस्त्रायलवर हल्ला केला आहे.
  • इस्त्रायलमध्ये बॉम्बस्फोटाचे आवाज ऐकू येत आहेत. ठिकठिकाणी सायरनचे आवाज येत आहेत. इराणने बॅलिस्टिक मिसाइलने हाइफावर हल्ला केला आहे. ही आंतरखंडीय क्षेपणास्त्रे असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे इराणच्या या ताज्या हल्ल्यात इस्रायलचे किती नुकसान झाले आहे, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, इराणने इस्त्रायलवर दहा ठिकाणी हल्ले केले आहेत.
  • आयडीएफ वृत्तसंस्थेने सांगितले की, इराणकडून साधारण 20-30 बॅलिस्टिक मिसाइल दागण्यात आले आहेत. इराणकडून साधारण 20-30 बॅलिस्टिक मिसाइल दागण्यात आली आहे. इस्त्रायली सैन्याने सांगितले की, ते इराणकडून दागण्यात आलेल्या मिसाइलची ओळख करीत आहेत. आमची यंत्रणा धोका रोखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करीत आहे.

Related Articles

Back to top button