देश - विदेश
संताप, आक्रोश, सुडाग्नी पेटला

- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज जाहीर केले की, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले करून फोर्डो, नतान्झ आणि इस्फहानमधील तीन अणुस्थळांना लक्ष्य केले आहे. अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यानंतर आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ट्रम्प यांचे आभार मानले आहेत.
-
दरम्यान, अमेरिकेच्या या मोठ्या हल्ल्यानंतर इराण प्रचंड संतापला आहे. इराणने त्यांच्या सरकारी वृत्तवाहिनीवरुन अमेरिकेला इशारा दिला आहे. युद्ध तुम्ही सुरु केले आहे, शेवट आम्ही करु. आता प्रत्येक अमेरिकन आणि त्यांचा जवान आमचे लक्ष्य असेल. मोठ्या युद्धासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. इराणकडून अमेरिकेला नक्कीच प्रत्त्युत्तर मिळेल, अशी धमकीच इराणने दिली आहे. अमेरिकेचे आजपर्यंत कधी झाले नाही असे नुकसान होईल, असा इशारा इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी दिला आहे. त्यामुळे आता मध्यपूर्वेत युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे.
- अमेरिकेने इराणमधील अणु तळांवर बॉम्ब टाकल्यानंतर नेतन्याहू यांनी आभार मानले. नेतन्याहू म्हणाले, अध्यक्ष ट्रम्प यांचे आभार. तुम्ही इराणमधील अणु तळांवर हल्ला करण्यासाठी कठोर पाऊल उचलले आहे. यामुळे इतिहास बदलेल. ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ अंतर्गत इराणवर अनेक प्रभावी हल्ले केले, परंतु अमेरिकेचा हल्ला खरोखरच अतुलनीय होता.



