खेळ

रोहितने भर सामन्यात शिवी दिल्याचा व्हिडीओ व्हायरल

पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेश संघाने बाजी मारली. रविवारी ढाकाच्या शेर ए बांगला स्टेडियमवर हा सामना खेळला गेला असून भारतीय संघाने हाता तोंडाला आलेला घास गमावला. बांगलादेशने अवघ्या एका विकेटने विजय मिळवला. भारतीय संघाला त्यांच्या सुमार क्षेत्ररक्षणाचा परिणाम म्हणून पराभव स्वीकारावा लागला. 

बांगलादेश संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाचे फलंदाज एकापाठोपाठ एक विकेट गमावत राहिले. भारतीय संघ 50 षटकांच्या या सामन्यात अवघ्या 41.2 षटकात सर्वबाद झाला. यादरम्यान भारतीय फलंदाज 186 धावांपर्यंत मजल मारू शकले. बांगलादेशच्या फलंदाजांनीही स्वस्तात विकेट्स गमावल्यामुळे भारतीय संघाकडे सामना जिंकण्याची संधी होती. पण गोलंदाज शेवटच्या 10 षटकांमध्ये एकही विकेट घेऊ शकले नाहीत.
राहुलने सामन्याच्या 43 व्या षटकात हसन याचा सोपा झेल सोडला, जो भारताला विजय मिळवून देऊ शकत होता. बांगलादेशने 40 व्या षटकात त्यांची 9 वी विकेट गमावली होती.
याच षटकातील पुढच्या चेंडूवर वॉशिंगटन सुंदरकडे झेल घेण्यासाठी संधी होती, पण तो चेंडू जवळ देखील पोहोचला नाही. संघाने जर या दोन चुका टाळल्या असत्या, तर नक्कीच सामन्याचा निकाल भारताच्या बाजूने लागला असता. झेल सोडल्यानंतर कर्णधार रोहित शर्माचा पारा चढला होता. जेव्हा हे झेल सुटले, त्यावेळी रोहितने शिवी दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  

Related Articles

Back to top button