सोलापूर
ब्रेकिंग! पुण्यात राज ठाकरे यांच्या मनसेला भगदाड

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर असून पक्षबांधणीच्या कामात व्यस्त आहे. मात्र, दुसरीकडे राज यांना मोठा धक्का बसला आहे. पुण्यात मनसेला खिंडार पडले आहे. एकाच वेळी मनसेच्या चारशे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. पुण्यातील मनसेचे आक्रमक नेते वसंत मोरे नाराज असल्याची चर्चा आहे.
अशात त्यांच्याच समर्थकाने पक्षाला रामराम ठोकला आहे. त्याचबरोबर मोरे यांना राष्ट्रवादीकडून ऑफर मिळाली आहे. मनसेचे माथाडी जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांचे समर्थक नाराज होते. त्यामुळे माझिरे यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर चारशे पदाधिकाऱ्यांनी मनसेला रामराम ठोकला आहे.