१७ व्या वर्षी लग्न, अंडरवर्ल्डशी कनेक्शन

Admin
1 Min Read

९० च्या दशकात बिकिनी गर्ल म्हणून अभिनेत्री सोनम खान ओळखली जायची. सोनम आता पुन्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये पुनरागमन करत आहे. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्यासोबत समुद्र किनारी बिकिनी लूकने सर्वांच्या मनावर राज्य करणाऱ्या सोनमने नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास सज्ज झाल्याचे सांगितले आहे.

गेल्या तीन वर्षांपासून मी बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे. पण ते शक्य नाही झाले. त्यात कोविडची लाट आली. पुन्हा सगळ्या गोष्टी सेट करण्यासाठी खूप वेळ लागतो. मी नेहमी माझ्या कुटुंबासोबत राहिली आहे. जुन्या गोष्टी विसरण्यातच शहाणपण आहे, असे सोनम म्हणाली.
त्रिदेव चित्रपटाचे निर्माते राजीव राय यांच्याशी मी लग्न केले. तेही खूप कमी वयात (१७ व्या वर्षी). राजीव यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यामुळे आम्हाला भारत सोडून लॉस एंजेलिस येथे गेलो. स्विझरलँड येथे आम्ही शिफ्ट झालो. त्यानंतर १५ वर्षे आम्ही वेगळे राहिलो. आमचा घटस्फोट झाला, असे सोनम म्हणाली.
सोनमचे अंडरवर्ल्डशी असलेल्या कनेक्शनमुळे त्यांचा घटस्फोट झाला, असे म्हटले जाते. त्यांना एक मुलगा आहे. आता सोनम ५० वर्षांची आहे. इंडस्ट्री सोडून तिला ३० वर्षे झाली आहेत. आता ती पुनरागमन करते, हे ऐकून चाहते आनंदी झाले आहेत.

Share This Article