खुशखबर! भारतीय नौदलात नोकरीची संधी

भारतीय नौदलाने वरिष्ठ माध्यमिक भर्ती आणि मॅट्रिक रिक्रूट अंतर्गत अग्निवीर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. भारतीय नौदल एसएसआर एमआरसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ८ डिसेंबरपासून सुरू होईल. यासाठी इच्छुक अविवाहित पुरुष आणि अविवाहित महिला उमेदवार १७ डिसेंबरपर्यंत अधिकृत वेबसाइट www.joinindiannavy.gov.in वर अर्ज करू शकतात.
भरतीचे उद्दिष्ट १५०० रिक्त पदे भरण्याचे आहे. १४०० पदे नौदल एसएसआर भरतीसाठी आहेत आणि १०० पदे एमआर भरतीसाठी १/२०२३ (मे २३) बॅचसाठी आहेत. एसएसआर भरती अंतर्गत ११२० पुरुष आणि २८० महिला उमेदवारांची भरती केली जाईल. एमआर भरती अंतर्गत ८० पुरुष आणि २० महिला उमेदवारांची भरती केली जाईल.
शैक्षणिक पात्रता काय?
NAVY SSR – भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाद्वारे मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळातून उमेदवाराने गणित आणि भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र/ जीवशास्त्र/ संगणक विज्ञान या विषयांसह १२वी उत्तीर्ण केलेली असावी.
NAVY MR – भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या शालेय शिक्षण मंडळातून उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. उमेदवारांची वयोमर्यादा १ मे २००२ ते ३१ ऑक्टोबर २००५ दरम्यान असावी. याचा अर्थ साडेसतरा ते एकवीस वर्षांचा असावा.