वीरशैव व्हिजनचे धर्मराज काडादी यांना पाठिंबा

वीरशैव समाज हा संयमी, सहनशील, सोशिक, उद्यमशील तर आहेच तसेच कोणाच्याही अध्यात मध्यात न पडणारा समाज आहे. श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना हा वीरशैवांची अस्मिता आहे. या अस्मितेशी खेळ करण्याचा प्रकार कोणीही करण्याचा प्रयत्न करू नये आणि तो केल्यास वीरशैव समाज स्वस्थ बसणार नाही, असा इशारा वीरशैव व्हिजनच्या वतीने देण्यात आला.
‘श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना बचाव’ आणि बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करणेविषयी आंदोलनास जाहीर पाठिंबा देत असलेबाबतचे पत्र काल वीरशैव व्हिजनच्या वतीने संचालक धर्मराज काडादी यांना भेटून देण्यात आले.
स्मार्ट सोलापूरात विमानसेवा सुरु करण्यासाठी आमचा कोणताही विरोध नाही. तसेच मोठया प्रमाणावर प्रवासी व कार्गो विमानसेवा सुरु होण्यासाठी बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ योग्य राहील असे आम्हाला वाटते. बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाला जागा उपलब्ध असताना शहरी व रहिवासी भागातील होटगी रोड विमानतळाचा आग्रह का धरला जात आहे?
श्री सिध्देश्वर साखर कारखान्याची चिमणी न पाडता विमानसेवा सुरु करणार आहोत असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहिर केले आहे. पालकमंत्र्यांनी विमानसेवेविषयी सामंजस्याची भूमिका घेऊन हा प्रश्न सोडवण्याची हमी दिलेली असताना कारखान्याच्या विरोधात सध्या सुरु असलेले आंदोलन हे पूर्णतः दिशाभूल करणारे आहे. पालकमंत्र्याच्या भुमिकेचा सोलापूरकरांनी आदर करावा असे आम्हाला वाटले
सोलापूर व उस्मानाबाद जिल्हात श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची ओळख अत्यंत पारदर्शी, काटकसरीने कारभार करून उसाला चांगला दर देणारा कारखाना अशी आहे जर हा कारखाना बंद पडला तर सभासद, शेतकरी, शेतमजुर, कामगार व व्यापारी यांचे अतोनात नुकसान होणार आहे. गेल्या अनेक दशकापासून माजी चेअरमन धर्मराज काडादी यांच्या नेतृत्वाखाली कारखाना सोलापूरच्या विकासाचा दिपस्तंभ म्हणून कार्यरत आहे.
सध्या गाळप थांबवण्याचे आदेश विरोधात श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना बचाव व बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करण्यासाठी धर्मराज काडादी यांना वीरशैव व्हिजनचा सक्रिय पाठिंबा यावेळी जाहीर करण्यात आला. तसेच यापुढील काळात ‘कारखाना बचाव’साठी धर्मराज काडादी जी भूमिका घेतील त्यात वीरशैव व्हिजन सक्रिय राहील, अशी भूमिका यावेळी स्पष्ट करण्यात आली.
यावेळी संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समिती अध्यक्ष चिदानंद मुस्तारे, उपाध्यक्ष सिद्राम बिराजदार, सचिव नागेश बडदाळ, सहसचिव संजय साखरे, सहकोषाध्यक्ष विजयकुमार बिराजदार, कार्याध्यक्ष शिवानंद सावळगी, सहकार्याध्यक्ष राजेश नीला, मनोज पाटील, गंगाधर झुरळे, मेघराज स्वामी, मन्मथ कपाळे, योगेश कापसे, गौरीशंकर अतनुरे, अमित कलशेट्टी, बसवराज चाकाई, युवक आघाडी अध्यक्ष विजयकुमार हेले, शिव कलशेट्टी, अविनाश हत्तरकी, सिद्धेश्वर कोरे, अमोल कोटगोंडे, सचिन विभुते, सोमनाथ चौधरी, चेतन लिगाडे, ओंकार म्हेत्रे, शरण होळीकट्टी उपस्थित होते.