खेळ
बीसीसीआय अॅक्शन मोडमध्ये ; संपूर्ण निवड समितीच केली बरखास्त

टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीसुद्धा गाठू शकला नाही आणि उपांत्य फेरीत इंग्लंडने धुव्वा उडविल्यानंतर अपेक्षेप्रमाणे सफाई मोहिम सुरु आहे आणि त्यात सर्वप्रथम भारतीय क्रिेकेट नियामक मंडळाने अख्ख्या निवड समितीचीच उचलबांगडी केली आहे. ह्या निवड समितीच्या प्रमुखपदी चेतन शर्मा असून हरविंदर सिंग, सुनील जोशी, देवशिश मोहंती हे समितीचे इतर सदस्य आहेत.
- मात्र यासंदर्भात आपल्याला मंडळाकडून अद्याप काहीही कळविण्यात आले नसल्याचे चेतन शर्मा यांनी म्हटले आहे. ह्या उचलबांगडीमुळे सर्वात कमी कार्यकाळ राहिलेली निवडसमिती अशी ह्या समितीची नोंद झाली आहे.
- यापैकी काहींची नियुक्ती २०२० मध्ये आणि काहींची नियुक्ती २०२१ मध्ये झाली होती.
- निवड समिती सदस्यांचा कार्यकाळ साधारणपणे चार वर्षाचा असतो. या निवड समितीत पश्चिम विभागाचा प्रतिनिधी नव्हता. शर्मांच्या नेतृत्वातील ही समिती डिसेंबर २०२० पासून कार्यरत होती.