देश - विदेश
‘आप’च्या भ्रष्ट नेत्याला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट

मनी लाँड्रिंग प्रकरणी तिहार जेलमध्ये असलेल्या दिल्लीच्या आप सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल. यावरुन नेमके ते जेलमध्ये आहेत की मसाज पार्लरमध्ये? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री जैन यांना तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे. जैन जेलमधील बेडवर पडले असताना त्यांच्या पायाची एक व्यक्तीकडून आरामात मालिश सुरु असल्याची व्हिडीओत दिसते. तर जैन कसले तरी पेपर वाचताना दिसत आहेत. तिहार तुरुंगातील व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजपने पुन्हा एकदा केजरीवाल सरकारवर निशाणा साधला आहे.
या व्हिडीओनंतर जेल प्रशासनावर आक्षेप ईडीने कोर्टात तक्रार दाखल केली आहे. जैन यांना तुरुंगात देण्यात आलेल्या व्हीआयपी ट्रीटमेंटवर भाजपने प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. जैन हे मनी लाँड्रिंग प्रकरणात तिहार जेलमध्ये आहेत. जेलमध्ये शिक्षा भोगत असतानाही जैन हे सुखासीन आयुष्य जगत असल्याचे स्पष्ट होते. याबाबत चौकशी सुरु झाली आहे.