- लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची आज दिल्लीतील इंदिरा भवन येथे पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मत चोरीवरून भाजपवर गंभीर आरोप केले. तसेच पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक मतदारसंघांचे उदाहरण देत मते वाढविण्यात आल्याचा आरोपही केला.
- राहुल म्हणाले की, काँग्रेस समर्थनार्थ असणारी मतदारांची नावे मतदार यादीतून जाणीवपूर्वक वगळण्यात आली. दलित आणि आदिवासींची देखील मते वगळण्यात आली आहे. यासाठी एक सॉफ्टवेअर वापरण्यात आले. कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून ६०१८ मते डिलीट केली. तर महाराष्ट्राच्या राजुरा मतदारसंघातून ६८५० मते वाढली. वेगवेगळ्या राज्यातील नंबर वापरून हे मते डिलीट करण्यात आली आहे. सूर्यकांत नावाच्या व्यक्तीने १४ मिनिटात १२ डिलिट अर्ज भरले, असे त्यांनी म्हटले.
- सूर्यकांत नावाच्या व्यक्तीच्या नावाने अर्ज करून १२ मते डिलिट करण्यात आली. मात्र सूर्यकांत यांना याबाबतची कोणतीही कल्पना नव्हती. ज्या सूर्यकांत यांच्या नावाने ही नावे डिलिट करण्यात आली त्या सूर्यकांत यांना राहुल गांधींनी माध्यमांसमोर बोलावले आणि त्यांनाच याबाबत अधिक माहिती देण्यास सांगितले. त्यानंतर मी मते डिलिट करण्यासाठी कोणताही अर्ज केला नव्हता, असे सूर्यकांत नावाच्या व्यक्तीने म्हटले.
ब्रेकिंग! राहुल गांधींचा मोठा धमाका
