माझ्या बुद्धीची किंमत महिन्याला दोनशे कोटी

Admin
1 Min Read
  • माझ्या बुद्धीची महिन्याची किंमत दोनशे कोटी रुपये आहे. पैशांसाठी मी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत. नागपुरात अ‍ॅग्रीकॉस वेलफेअर सोसायटीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
    सध्या इथेनॉल ब्लेंज फ्यूलची सर्वत्र चर्चा सुरु आहे. सरकारने आता सर्वच पेट्रोल पंपांवर इथेनॉलचा समावेश असणारे पेट्रोल विकणे अनिवार्य केले आहे. सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला जात असून गडकरी यांच्यावरही टीका केली जात आहे. त्यावर बोलताना गडकरी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
    मी हे सगळं पैशांसाठी करतोयं, असे तुम्हाला वाटतंय का…इमानदारीने कसे पैसे कमवायचे हे मला चांगलेच माहिती आहे. विदर्भात साधारण दहा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ही लाजिरवाणी बाब असून देशातला शेतकरी समृद्ध होत नाही तोपर्यंत आमचे प्रयत्न चालूच राहणार असल्याचे गडकरींनी स्पष्ट केले आहे.
    दरम्यान, समाजातल्या गरीब माणसाची सेवा करत राहिलो पाहिजे. आपल्याला राजकारणामध्ये मते मिळत राहतात. प्रत्येक राजकारणी हा पुढच्या निवडणुकीबद्दल विचार करतो तर प्रत्येक समाजसेवक हा पुढच्या समाजाच्या घटकाबद्दल विचार करतो. त्यामुळे आपला जॉब हा थँकलेस असल्याचेही गडकरी म्हणाले.
Share This Article