मनोरंजन

बॉक्स ऑफिसवर ‘कांतारा’ सुस्साट ; लवकरच चारशे कोटींचा टप्पा पार

कांतारा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. ऋषभ शेट्टीचा हा चित्रपट होऊन जवळपास दीड महिना झाला आहे. परंतु चित्रपटगृहामध्ये अजूनही हा चित्रपट पाहण्यासाठी लोक उत्सुक झाले आहेत. लवकरच हा चित्रपट जगभरातून एकूण चारशे कोटींचा टप्पा पार करेल.
कांतारा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची बातमी समोर येत होती. परंतु चित्रपटाला चित्रपटगृहात मिळत असलेल्या उत्तम प्रतिसादामुळे ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित होण्यास थोडा उशीर करण्यात आला.
परंतु आता या चित्रपटाच्या ओटीटीवरील प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. या आधी 4 नोव्हेंबर रोजी ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित होईल, असे म्हटले जात होते. परंतु त्यानंतर याची तारीख पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आता 24 नोव्हेंबरपासून ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होईल.

Related Articles

Back to top button