राजकीय

ब्रेकिंग! जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढला पाहिजे

  • आज अभूतपूर्व गर्दीत ठाकरेंचा विजयी मेळावा वरळीतील डोममध्ये आयोजित करण्यात आला. तब्बल २० वर्षांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र आले. शिवसैनिकांच्या कार्यकर्त्यांमध्ये यामुळे मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या मेळाव्याची सुरुवात राज ठाकरे यांच्या भाषणापासून झाली. 
  • यावेळी त्यांनी राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ताशेरे ओढले.
  • शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूंच्या आक्रमक भूमिकेनंतर राज्य सरकारने जीआर मागे घेतला. यावर राज म्हणाले, खरंतर आज मोर्चा निघायला हवा होता. मराठी माणूस सर्वबाजूने कसा एकवटतो याचं चित्र मोठ्या प्रमाणावर उभे राहीले असते. पण नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली. हा मिळावा शिवतीर्थावर व्हायला हवा होता. 
  • विनाकारण उठसूठ मारामारी करायची गरज नाही. मात्र जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे पुन्हा. पण चूक त्यांची असली पाहीजे. मात्र यापुढे अशी कोणतीही गोष्ट कराल त्याचे व्हिडीओ काढू नका. मारणारा कधी सांगत नसतो, मार खाणारा सांगत असतो, मला मारलं म्हणून.
  • राज ठाकरे पुढे म्हणाले, मी मागे एका मुलाखतीत म्हटले होते की कोणत्याही वादापेक्षा भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. 20 वर्षानंतर उद्धव आणि मी एका व्यासपीठावर येतोय. जे माननीय बाळासाहेबांना, अनेकांना जमलं नाही, आम्हाला एकत्र आणायचे ते देवेंद्र फडणवीसांना जमले.

Related Articles

Back to top button