कुली! बॉक्स ऑफिसवर सुपरस्टार रजनीकांतचा धमाका

Admin
1 Min Read
  • सुपरस्टार रजनीकांत हिरो आणि किंग नागार्जुन खलनायक म्हणून असलेला ‘कुली’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. 
  • श्रुती हसन, सत्यराज, बॉलिवूड स्टार आमिर खान, कन्नड स्टार उपेंद्र, मल्याळम स्टार अभिनेता सौबिन शाहीर असा तगडा स्टारकास्ट असल्याने ‘कुली’ चित्रपटाची जोरदार चर्चा होती. सन पिक्चर्सच्या बॅनरखाली कलानिधी मारन निर्मित या चित्रपटाची चाहत्यांना खूपच उत्सुकता होती. अनिरुद्धचे धमाकेदार संगीत असलेला हा चित्रपट आज तमिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये रिलीज झाला आहे. 
  • रजनीकांतने एकट्यानेच संपूर्ण चित्रपट गाजवला आहे. सायमनच्या भूमिकेत नागार्जुनने खलनायक म्हणून अंगावर काटे आणले आहेत. पाहुणा कलाकार म्हणून आमिर खाननेही छाप पाडली आहे. अ‍ॅक्श दृश्यांना अनिरुद्धचे पार्श्वसंगीत कमाल आहे. ‘कुली’ हा एक हजार कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा पहिलाच तमिळ चित्रपट ठरणार आहे, असे एका नेटकऱ्याने ट्विट केले आहे.
Share This Article