देश - विदेश

ब्रेकिंग! गॅस सिलेंडरचे दर पुन्हा वाढणार

देशातील वाढत्या महागाईमुळे जनता त्रस्त आहे. इंधनाचे दर वाढले आहेत, त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच आता नागरिकांच्या संकटात भर घालणारी बातमी समोर येत आहे.

व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गॅस सिलेंडर विक्री दरात दिली जाणारी सवलत बंद करण्याचे निर्देश तेल कंपन्यांनी वितरकांना दिले आहेत.
तेल कंपन्यांच्या या नव्या आदेशामुळे तब्बल दोनशे ते तीनशे रुपयांची सवलत बंद होणार आहे. त्यामुळेच व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. या सिलेंडरवर वितरकांच्या तक्रारी लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे.
इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारी तेल कंपन्यानी त्यांच्या वितरकांना ही सवलत तात्काळ बंद करण्यास सांगितले आहे. तेल कंपनी यांनी व्यावसायिक सिलेंडरवर सवलत देणाऱ्या घरगुती सिलेंडरवरील तोटा भरून काढण्याची मागणी अलीकडेच केंद्र सरकारकडे केली होती. वितरकांना सवलत म्हणून जी रक्कम दिली जात होती ती आता कमी होणार आहे. याचा फटका मात्र ग्राहकांना बसू शकतो.  

Related Articles

Back to top button