- उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये धराली हे गाव आहे. या गावावर निसर्गाने सौंदर्याची उधळण केली आहे. पण हाच निसर्ग जेव्हा आक्राळविक्राळ रुप धारण करतो, तेव्हा हृदयाचा थरकाप उडतो. उत्तर काशीच्या धराली गावात अशीच दुर्घटना घडली आहे. धराली गावात ढगफुटी झाल्यानंतर खीरगंगा नदीने संपूर्ण गाव गिळले आहे. काही क्षणांपूर्वी हे गाव दिमाखात होते. पण खीरगंगा नदीतून वाहत आलेल्या मातीच्या ढिगाऱ्याने क्षणात होत्याचे नव्हते केले.
- ढगफुटी होण्यापूर्वी इथं तीन ते चार मजली इमारती उभ्या होत्या. पण ढगफुटीनंतर या उंच इमारतींचे फक्त छत दिसत होते. काही बंगले तर प्रवाहासोबत बाजुला फेकले गेले होते. ढगफुटीनंतर अवघ्या 35 सेकंदात गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली आले होते. 35 सेकंदात या घरांमधली माणसं स्वत:चा जीव वाचवण्यासाठी काय करणार? ज्यांना ढगफुटी झाल्याचा अंदाज आला त्यांनी नक्कीच वाचण्याचा प्रयत्न केला असेल. पण किती जणांना स्वत:चा जीव वाचवता आला याची माहिती अजून मिळालेली नाही.
- या नैसर्गिक संकटात भारतीय लष्कराचाही मोठा फटका बसला आहे. हर्षिलमधील १४ राजरिफ युनिटच्या कॅम्पला पुराचा फटका बसला असून, १० जवान आणि एक जेसीओ अद्याप बेपत्ता आहेत.
ब्रेकिंग! भयानक ढगफुटी, संपूर्ण गावाला नदीने गिळले
