सोलापूर
ब्रेकिंग! सोलापुरात मुसळधार पाऊस

- सोलापूर शहर व परिसरात काल रात्रीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. या मुसळधार पावसामुळे हवामानात मोठे बदल दिसून येत आहेत. शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. आज सकाळ सुद्धा पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले.
- गेल्या अनेक दिवसापासून सोलापूर शहरात पावसाने दडी मारली होती. मात्र या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी वादळी वारा, विजा आणि पावसाच्या वेळी खबरदारी घ्यावी. झाडाखाली, टॉवर्सजवळ, ध्वज वा वीजखांबाजवळ, ट्रान्सफॉर्मर किंवा धातूच्या कुंपणाजवळ थांबू नये. विजा चमकत असताना घरातच सुरक्षित राहावे. कोणतेही विद्युत उपकरण वापरू नये. ट्रॅक्टर, शेती अवजारे, सायकल, मोटारसायकलपासून दूर राहावे. लोंबकळणाऱ्या केबल्सपासून सावध रहावे. जाहिरात फलक (होर्डिंग्ज) कोसळण्याची शक्यता असल्याने त्यांच्या आसपास थांबू नये. मोकळ्या जागेत असताना विजा चमकत असल्यास गुडघ्यांवर बसून, हातांनी कान झाकावेत आणि डोके गुडघ्यांमध्ये ठेवून जमिनीशी कमी संपर्क ठेवावा, असे प्रशासनाने कळवले आहे.



