पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह; आता बायकोसोबत भांडण अन् सासरचा त्रास

Admin
1 Min Read
  • सध्याच्या काळात धक्कादायक घटनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे. एका विवाहित व्यक्तीने आत्महत्या केली असून त्याने एक व्हिडीओ बनवला आहे. त्याने या व्हिडिओमध्ये बायकोसह, सासरच्या लोकांनी आपला छळ केल्याचे म्हटले आहे. अकोल्यातील पारस येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. संघपाल खंडारे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून तो ऑटोरिक्षा चालवण्याचे काम करत होता.
  • संघपालचा पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्याने धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली आहे. त्याने सासरच्या ६ ते ७ लोकांनी आपल्याला मारहाण केली होती, असे म्हटले आहे. व्हिडीओ बनवल्यानंतर त्याने त्यामध्ये ज्या लोकांनी त्याला त्रास दिला होता त्यांची नाव घेतली आहेत.
  • संघपाल याने व्हिडीओ काढल्यानंतर तो सर्व नातेवाईकांना पाठवला आहे. सासरच्या लोकांनी आपल्याला कर्ज काढायला सांगितले होते. सासरच्या लोकांपासून आपल्या जीविताला धोका होता. व्हिडिओमधून त्याने आपल्या जीविताला धोका असलेल्या व्यक्तींच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
  • दरम्यान, या प्रकरणात रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी संघपालच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच चार जणांना अटक केली आहे. यामध्ये पत्नी, सासूसह तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.
Share This Article