- राज्यात अनेक ठिकाणी स्पा सेंटर सुरू आहेत. या ठिकाणी मसाज केली जाते असे सांगितले जाते. पण या स्पा सेंटरच्या नावाखाली नको ते प्रकार सर्रासपणे सुरू असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. असे असले तरी अशा स्पा सेंटरवर कुणाचे ही नियंत्रण नसते. त्यामुळे हे स्पा सेंटर सुरू असल्याची दिसून येतात. शिवाय त्याला राजकीय संरक्षण ही असते की काय असा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्याला कारण ही तसेच आहे. असाच धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये उघड झाला आहे. विशेष म्हणजे हे स्पा सेंटर एका राजकीय पक्षाच्या नेत्याचेच आहे.
- नांदेडमधील कॅनल रोडवर रेड ओक स्पा टू सेंटर आहे. या स्पा सेंटरमध्ये नको ते धंदे सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तिथे कारवाई करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. पोलिसांना मिळालेल्या माहिती नुसार स्पा सेंटरच्या नावाखाली येथे अश्लील प्रकार सुरू होते. याची शहानिशा करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. त्यामुळे पोलिसच बनावट ग्राहक बनून या स्पा सेंटरमध्ये गेले.
- त्यानंतर तेथे छापा टाकण्यात आला. दरम्यान या स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या स्पा सेंटरमधून चार महिलांची सुटका करण्यात आली आहे. यातील एक मुलगी ही आसामची होती तर तीन मुली या नागपुरच्या होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
हायफाय मुली, रंगीबेरंगी सजावट, स्पा सेंटर अन् नको ते धंदे!
