क्राईम
पोलीस कॉन्स्टेबलचे बाहेर लफडं

- एक अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. घरगुती वादातून पत्नीने आपल्या पोलीस पतीची हत्या करून स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना त्यांचा लहान मुलगा समोर असतानाच घडली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
- मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव मुकेश परमार असून त्यांच्या पत्नीचे नाव संगीता परमार आहे. मुकेश हे अहमदाबाद शहरातील दानीलिमडा पोलीस लाईन्समध्ये राहतात आणि ते ए डिव्हिजन ट्रॅफिक पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते. प्राप्त माहितीनुसार, घरगुती वादातून त्यांच्यात नेहमीच वाद होत असत. मुकेश यांचे दुसऱ्या महिला सहकाऱ्यासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. हाच मुद्दा त्यांच्या वैवाहिक वादाचे मूळ असल्याचे सांगितले जात आहे.
- घटनेच्या दिवशीही त्यांच्यात जोरदार भांडण झाले. संतप्त झालेल्या संगीताने घरात असलेल्या लाकडी खेळण्यातील घोड्याच्या पायाने मुकेश यांच्या डोक्यावर जोरदार वार केला. या मारहाणीत मुकेश जागीच कोसळले आणि रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर संगीताने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.



