CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 75?
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असताना आता याबाबत निवडणूक आयोगाने मोठी अपडेट दिली आहे. या माहितीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्याने होणार असून डिसेंबर ते जानेवारीच्या दरम्यान पालिका निवडणुका होण्याची शक्यता असल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले आहे. डिसेंबर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात निवडणुका सुरू राहतील, असेही संकेत वाघमारे यांनी दिले आहेत. नाशिकमध्ये पार पडलेल्या आढावा बैठकीत वाघमारे यांनी ही माहिती दिली आहे.
- एक जुलै 2025 पर्यंतच्या मतदार यादीच्या आधारे निवडणूक घेण्यात येणार आहे. प्रारूप प्रभाग रचना निश्चित झाल्यावर पुढील प्रक्रिया राबवली जाईल. निवडणुकीसाठी आवश्यक असणारे अधिकारी, कर्मचारी व तांत्रिक यंत्रणा यांचा आढावा देखील बैठकीत घेण्यात आला. दिवाळीनंतर म्हणजे ऑक्टोबर अखेरनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.