क्राईम
आरारा…खतरनाक! भाईचा बड्डे, वाजले बारा…

- पुण्यातील विमान नगर आणि कल्याणी नगर हा उच्चभ्रू भाग म्हणून ओळखला जातो. मात्र हा भाग आता पार्टी हब झाला आहे. विमाननगरमधील एका पबमध्ये गुन्हेगारांची डीजे पार्टी आयोजित करण्यात आली होती. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलीस स्टेशन येथून हाकेच्या अंतरावर असताना बर्थडे पार्टीचा गोंधळ सुरू होता. बर्थडे करणाऱ्या भाईच्या पेनटरने सर्व व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकले होते.
- शनिवारी मध्यरात्री विमाननगरमधील दत्त मंदिर चौकातल्या “Three Musketeers” या पबच्या पार्किंगमध्ये काही कथित ‘भाई’ लोकांनी एकत्र येत बर्थडे पार्टी साजरी करत गोंधळ घातला. या पार्टीमध्ये शंभरहून अधिक युवक सहभागी झाले होते. ही पार्टी विमानतळ पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार फिरोज शेख याने आयोजित केली होती. विशेष म्हणजे, फिरोजवर कलम 353 अंतर्गत (सरकारी कर्मचाऱ्याला अडथळा निर्माण करणे) गुन्हा दाखल आहे. मात्र तरीही आरोपी मोकाट असून पार्टी करीत परिसरात गोंधळ घालताना दिसले.



