- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा धक्का देण्याच्या विचारात आहेत. काही दिवसांपूर्वी भारतावर तब्बल 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली होती. या घोषणेमुळे भारताला चांगलाच हादरा बसला होता. आता पुन्हा एकदा ट्रम्प यांनी या टॅरिफमध्ये वाढ करणार असल्याची चर्चा आहे.
- ट्रम्प यांचा या निर्णयाने भारताला नेमका काय फटका बसणार आहे?, किती कोटींचे नुकसान होऊ शकते?, अमेरिकेने लावलेला हा टॅरिफ कमी कसा करता येऊ शकतो? यावर भारताचा अभ्यास चालू आहे. अशातच ट्रम्प यांच्या 25 टक्के टॅरिफ आकारण्याच्या धक्कादायक निर्णयातून सावरत असतानाच ट्रम्प यांनी आणखी एक मोठा धक्का दिला आहे.
- आम्ही भारतावर आणखी टॅरिफ लावणार आहोत, अशी धक्कादायक घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. ट्रम्प यांनी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी भारतावर आणखी टॅरिफ लावण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. रशियामुळे युक्रेनमध्ये किती लोक मरत आहेत, याची भारताला काळजी नाही. भारत केवळ मोठ्या प्रमाणात रशियन तेल खरेदी करत नाही तर खरेदी केलेल्या तेलाचा बहुतेक भाग भारत खुल्या बाजारात नफ्यासाठी विकत आहे, असा दावाही ट्रम्प यांनी केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला पुन्हा धमकी
