ब्रेकिंग! काल व्हिलन, आज हिरो, भारताच्या विजयानंतर भर मैदानात मोहम्मद सिराज रडला

Admin
2 Min Read
  1. भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आज ओव्हल कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्ध आपल्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर भारताला अविस्मरणीय विजय मिळवून दिला.
  2. इंग्लंडला सामन्याच्या शेवटच्या दिवशी विजयासाठी फक्त ३५ धावांची गरज होती आणि त्यांच्याकडे चार गडी शिल्लक होते. मात्र, सिराजने पहिल्याच षटकापासून गडी बाद करायला सुरुवात केली आणि भारताला अवघ्या सहा धावांनी रोमांचक विजय मिळवून दिला. या विजयानंतर सिराजने एक मोठा खुलासा केला.
  3. सामन्यानंतर दिनेश कार्तिकशी बोलताना सिराज म्हणाला, मला नेहमीच विश्वास होता की कोणत्याही परिस्थितीत मी भारताला विजय मिळवून देऊ शकतो. आज सकाळी मी उठलो, माझ्या फोनवर गुगल केले आणि ‘बिलीव्ह’ इमोजीचा वॉलपेपर काढला. मी स्वतःला सांगितले की, मी हे देशासाठी करणार आहे. माझी एकच रणनीती होती. योग्य ठिकाणी चेंडू टाकायचा. गडी बाद होतात की धावा होतात, याने फरक पडत नाही. 
  4. चौथ्या दिवशी हॅरी ब्रूकने शतक ठोकले होते, पण त्याचा १९ धावांवर झेल सुटल्याबद्दल विचारले असता सिराज म्हणाला, जेव्हा मी चेंडू पकडला तेव्हा मला वाटले नाही की, मी सीमारेषेला स्पर्श करेन. तो सामना फिरवणारा क्षण होता. ब्रूक टी-२० शैलीत फलंदाजी करत होता. आम्ही सामन्यात मागे होतो, पण अल्लाहचा आभार. मी विचार केला की सामना हातातून निसटला. पण सिराजच्या जिद्दीने भारताने हा सामना जिंकला.
  5. सिराजने या सामन्यात दोन्ही डावांत आपली छाप सोडली. पहिल्या डावात त्याने १६.२ षटकांत ८६ धावा देत ४ गडी बाद केले, तर दुसऱ्या डावात ३०.१ षटकांत १०४ धावा देत ५ फलंदाजांना बाद केले. संपूर्ण मालिकेत त्याने सर्वाधिक २३ गडी बाद करत सर्वांना प्रभावित केले.
Share This Article