- मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने रोमांचक सामन्यात इंग्लंडकडून विजय हिसकावून घेत ओव्हल कसोटी सहा धावांनी जिंकली आहे. सिराजने दुसऱ्या डावातील पाच विकेटसह सामन्यात ९ विकेट घेतल्या आणि टीम इंडियाच्या विजयाचा स्टार बनला. यासह, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पाच कसोटी सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत संपवली आहे.
-
कसोटी क्रिकेटमध्ये आज संपूर्ण जगाला टी-२० पेक्षा थरारक असा सामना पाहण्याची संधी मिळाली. मालिकेत १-२ ने पिछाडीवर असलेल्या टीम इंडियाने इंग्लंडचा पाचव्या कसोटीत फक्त सहा धावांनी पराभव करून मालिका बरोबरीत सोडवली. आज शेवटच्या दिवशी इंग्लंडला 35 धावांची आवश्यकता होती, तर त्यांच्याकडे चार विकेट शिल्लक होते. सिराजने टीम इंडियासाठी शानदार गोलंदाजी केली आणि टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात तो सर्वात मोठा हिरो ठरला.
ब्रेकिंग! ओव्हलवर भारताने इतिहास घडला, कसोटीचा थरारक क्लायमॅक्स
