- गुलाबासारखे ओठ, पाणीदार डोळे, गालावर निरागस स्मित हास्य. फोटोमध्ये दिसणारी ही स्त्री, पहिल्यांदा पाहाल तर वाटेल ‘हीच खरी संस्कारी स्त्री’…’घरची लक्ष्मी’ समजलात. तीच निघाली घर लुटणारी चेटकीण. तिच्या हसऱ्या चेहऱ्याच्या मागे लपलंय एक थरारक गूढ. तिने लग्नाच्या नावाखाली भयंकर खेळ खेळला आहे. हो, या महिलेने केवळ दोन-चार नव्हे तर आठ लग्नं केली आहेत.
- पुरुषांना फसविणाऱ्या महिलेचे नाव समीरा फातिमा. ती उच्चशिक्षित असून नागपूरमध्ये शिक्षिका म्हणून ही तिने नोकरी केली आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून मुस्लिम धर्माचाच पुरुषाशी ओळख निर्माण करायची. तिचे शिक्षण, नोकरी हे ती सर्व समोरच्याला सांगायची. पुरुषांचा विश्वास संपादन करायची. मी पतीपासून घटस्फोट घेतला आहे. मला आधार द्या, मी तुमची दुसरी पत्नी म्हणून जगेल, असे ती सांगत असे. तिच्यावर विश्वास ठेवून अनेकांनी तिच्याशी निकाह म्हणजेच लग्न केले. बरं ती लग्न ही व्यावसायिक, पैशावाल्या लोकांसोबतच करायची.
- एखाद्याने लग्न करायला नकार दिला, तर त्याच्या घरात घुसून बळजबरी करून लग्न करायची. त्यावेळी ती आई-काका-काकू हे आपले नातेवाईक सुद्धा सोबत आणत होती. काझी आणून रितसर निकाहनामा करायची. त्यानंतर महिना, दीड महिन्यानंतर पतीशी भांडण करत पैशासाठी ब्लॅकमेल करायला सुरुवात करायची. पैसे न दिल्यास थेट गुन्हा दाखल करण्याची धमकी द्यायची. कोर्टात दावा दाखल करत होती. बदनामीमुळे या समीराला पुरुष लाखो रुपये देऊन टाकायचे.
- 2023 मध्ये तिने पठाण नावाच्या व्यक्तीला सुद्धा असंच फसवले होते. त्याच्याशी घरात घुसून जबरदस्तीने लग्न केले. त्यानंतर महिन्याभरात त्याच्याशी भांडण केले अन् पैसे मागू लागली. त्यानेही काही पैसे तिला दिले. पण समीरा त्यानंतर सुद्धा ब्लॅकमेल करत होती. वैतागलेल्या पठाणने समीराविरोधात गिट्टीखदान पोलिसांत तक्रार दिली. परंतु समीरा काही सापडली नाही. तब्बल दीड वर्ष ती फरार होती. परंतु तीन दिवसांपूर्वी समीरा ही नागपूरमधील सिव्हिल लाइन्स येथे आली होती. तेथील एका टपरीवर चहा पिण्यासाठी जात असताना पोलिसांनी तिला पकडले. पोलीस चौकशीत या महिलेने अनेक जणांना याच पद्धतीने फसवले असल्याचे, एक-दोन नाही तर आतापर्यंत तब्बल आठ जणांना फसविल्याचे पुरावेच पोलिसांच्या हाती लागले.
- तिच्याविरुद्ध तीन जणांनी गुन्हा फसवणुकीचा गुन्हा नोंदवल्याची गट्टीखदान पोलिस स्टेशनचे सहायक निरीक्षक शारदा भोपाले यांनी सांगितले.
गुलाबासारखे ओठ, पाणीदार डोळे, प्रेम, लग्न अन् धोका…
