- मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयाने आज निकाल जाहीर केला. माजी खासदार साध्वी प्रज्ञा या अन्य सात आरोपींसह निर्दोष सुटल्या आहेत. न्यायालयाच्या निकालानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘भगव्या’चा अपमान करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना देव शिक्षा करेल, असे वक्तव्य मालेगाव प्रकरणात निर्दोष सुटल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांनी केले.
- साध्वी प्रज्ञा म्हणाल्या की, त्यांच्यावर चुकीचे आरोप लावण्यात आले होते. निर्दोष आहे, हे सिद्ध करण्यासाठी त्यांना वारंवार लढा द्यावा लागला. अनेक वर्षे अपमान सहन करत होते. वारंवार संघर्ष करावा लागला. दोषी नसतानाही कलंकित ठरवण्यात आले, अशा भावना साध्वी प्रज्ञा यांनी रडून व्यक्त केल्या.
- आज भगवा जिंकला आहे, हिंदुत्व जिंकले आहे. भगवा दहशतवादाचा आरोप खोटा सिद्ध झाला आहे. भगव्याचा अपमान करणाऱ्यांना देव शिक्षा करेल, असा देखील इशारा त्यांनी दिला आहे.
मालेगाव ब्लास्ट खटल्यातून मुक्त झाल्यानंतर कोर्टातच रडल्या साध्वी प्रज्ञासिंह
