ब्रेकिंग! मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका

Admin
1 Min Read
  • मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल जाहीर झाला आहे. या स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. संशयाच्या आरोपांवर आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. या प्रकरणाचा निकाल मुंबईच्या एनआयए या विशेष न्यायालयात आज सुनावण्यात आला.
  • कर्नल पुरोहित यांनी आरडीएक्सची व्यवस्था केली होती, असा आरोप केला गेला. परंतु प्रसाद पुरोहित यांनी आरडीएक्स आणल्याचा पुरावा रेकॉर्डवर नसल्याचे न्यायालयाने म्हटले. बाईक व्यतिरिक्त काही ठिकाणी बॉम्ब होते, स्फोटात 95 जण जखमी झाले. दगडफेक झाली होती. गोळीबार सुद्धा झाला होता, असा युक्तिवाद सरकारने केला. बाईकवर ब्लास्ट झाला नाही. पंचनामा व्यवस्थित झाला नाही. साध्वी यांच्या नावाने बाईकचा चेसिस नंबर व्यवस्थित नव्हता. कट शिजला हे सिद्ध करण्यासाठी आवश्यक पुरावे नाहीत. मोबाईलमधूनही काही पुरावे नाही. बाईक साध्वी यांची होती हे सिद्ध होत नाही. आरडीक्स आणि बॉम्ब पुरोहित यांनी आणल्याचा पुरावा नाही. स्फोटासाठी पुराहित यांनी संस्थेची रक्कम वापरल्याचा पुरावा नाही. आरोपींमध्ये बैठक झाल्याचाही पुरावा नाही, असे देखील कोर्टाने म्हटले आहे.
  • 29 सप्टेंबर 2008 रोजी रमजान महिन्यात मालेगाव शहर हादरवणाऱ्या भीषण बॉम्बस्फोटाला 17 वर्षं पूर्ण झाले. या स्फोटात सहा निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर 100 पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले होते. भीकू चौकाजवळ एका बाईकवर ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट झाला होता. या घटनेने देश हादरला होता.
Share This Article