- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक खळबळजनक दावा केला. तसेच पाकिस्तानसोबत तेलसंबंधी व्यापार कराराची घोषणा केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिका आणि पाकिस्तान संयुक्तपणे पाकिस्तानमधील मोठ्या तेल साठ्यांचा विकास करणार आहे. पाकिस्तान या भागीदारीअंतर्गत भारतालाही तेल विकू शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
- ही घोषणा त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर केली. विशेष म्हणजे, ट्रम्प यांनी भारतावर एक ऑगस्टपासून 25 टक्के आयात कर लावण्याची घोषणा केली. त्यानंतर काही तासांतच हा नवा पाकिस्तानसंबंधी निर्णय जाहीर केला आहे.
- आम्ही नुकताच पाकिस्तानसोबत एक नवीन करार केला आहे. त्याअंतर्गत पाकिस्तान आणि अमेरिका मिळून त्यांच्या तेल साठ्यांचा विकास करतील. सध्या आम्ही या उपक्रमाचे नेतृत्व करणाऱ्या तेल कंपनीची निवड करण्याच्या प्रक्रियेत आहोत. कोणाला ठाऊक, कदाचित हे तेल भारतालाही विकले जाईल, असे देखील ट्रम्प यांनी सांगितले.
- ट्रम्प यांचा हा पाकिस्तानसंबंधी निर्णय भारतासाठी महत्त्वाचा राजकीय संदेश मानला जात आहे. कारण याच आठवड्यात त्यांनी भारताकडून होणाऱ्या आयातींवर 25 टक्के कर आणि अतिरिक्त दंड लावण्याची घोषणा केली होती.
ब्रेकिंग! भारताला मित्र मित्र म्हणत खंजीर खुपसला, पाकिस्तानशी हातमिळवणी
