दहशतवाद भगवा कधीच नव्हता, काँग्रेसने हिंदू समाजाची माफी मागावी

Admin
1 Min Read
  • मालेगावमधील भिक्खू चौकात 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आज जाहीर झाला. मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयाने निर्णय जाहीर करत सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. या निकालानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटण्यास सुरूवात झाली आहे.
  • मालेगाव स्फोटाच्या निकालावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करत अचूक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. ते त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात की, दहशतवाद ना कधी भगवा होता, ना कधी राहणार, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
  • काँग्रेसप्रणित युपीए सरकारने हिंदू दहशतवादाचा नरेटीव सेट करण्याचा प्रयत्न केला होता. हिंदू व भगवा आतंकवाद आहे, हा प्रचार करण्याचा प्रयत्न केला. तो किती खोटा हे आज सिद्ध झाले. कोर्टाने पुराव्यानिशी आज सांगितले आहे. ज्यांवर कारवाई केली, त्यांची काँग्रेसने माफी मागावी. संपूर्ण हिंदू समाजाची काँग्रेसने माफी मागावी, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
Share This Article