सुप्रसिद्ध अभिनेत्रीने भरधाव कारने विद्यार्थ्याला चिरडले

Admin
1 Min Read
  • एका प्रसिद्ध अभिनेत्रीला 21 वर्षीय तरुणाच्या हिट अँड रन प्रकरणात अखेर अटक करण्यात आली आहे. गुवाहाटी शहरात २५ जुलै रोजी पहाटे घडलेल्या या दुर्दैवी घटनेत एक गरीब विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर सोशल मीडियावर संतापाचा धुराळा उठला असून अभिनेत्रीविरोधात कडक कारवाईची मागणी केली जात आहे.
  • घटना घडली गुवाहाटीच्या दखिंगगाव परिसरात, जिथे पहाटे तीनच्या सुमारास समीउल हक नावाचा 21 वर्षीय विद्यार्थी घराकडे परतत असताना भरधाव स्कॉर्पिओने त्याला चिरडले. 
  • ही गाडी आसामी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नंदिनी कश्यप स्वतः चालवत होती, असे घटनास्थळी उपस्थित लोकांनी सांगितले. विशेष म्हणजे अपघातानंतर नंदिनी थांबली नाही, तर गाडी घेऊन फरार झाली. समीउलचे मित्र तिचा पाठलाग करत काहिलीपारा परिसरातील अपार्टमेंटपर्यंत पोहोचले, जिथे नंदिनी गाडी लपवत असल्याचा आरोप आहे. त्यावेळी झालेल्या वादविवादाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
  • समीउलच्या कुटुंबीयांनी सांगितले की, अपघातात त्याच्या डोक्याला जबरदस्त इजा झाली होती. दोन्ही पाय, मांडी आणि हातांची हाडं तुटलेली होती. त्याला गुवाहाटी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले, त्यानंतर एका खासगी रुग्णालयात हलवले. उपचारादरम्यान २९ जुलै रोजी संध्याकाळी आयसीयूमध्ये त्याचा मृत्यू झाला. 
Share This Article