असा माल हवा…मुलीचा व्हिडीओ शेअर करत खेवलकरांची खळबळजनक मागणी

Admin
1 Min Read
  • माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा जावई प्रांजल खेवलकरला पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टी करताना रंगेहात पकडले. ज्यानंतर खडसे यांनी थेट पुणे पोलिसांवरच गंभीर आरोप केले. आज कोर्टात खेवलकरांसोबतच निखिल जेठानंद पोपटाणी, समीर फकीर मोहम्मद सय्यद, सचिन सोनाजी भोंबे, श्रीपाद मोहन यादव या आरोपींना कोर्टात हजर केले आहे. या प्रकरणात कोर्टाने खेवलकरांसोबतच इतर चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
  • खेवलकरांच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह व्हिडीओ आणि चॅट पोलिसांना आढळून आले. मुलीचे व्हिडीओ पाठवत असा माल हवा असा मेसेज खेवलकरांच्या मोबाईलमध्ये मिळाला. यासंबंधित काही चॅट पोलिसांना सापडले आहेत. हे मेसेज खेवलकरांनी दुसऱ्या आरोपीला पाठवले होते. पुणे पोलिसांनी अशी माहिती कोर्टात दिली आहे.
  • दरम्यान न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे खेवलकरांचा जामिनाचा अर्ज देखील आता मोकळा झाला आहे. खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडीओ देखील पोलिसांना सापडल्याने खळबळ उडाली आहे. आता खेवलकरांच्या जामिनासाठी कधी अर्ज केला जातो, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टी करताना खेवलकरांना खराडीतून अटक केली होती.
Share This Article