- लोकसभेत सलग दुसऱ्या दिवशी आज ऑपरेशन सिंदूर संबंधी चर्चा सुरु आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, पहलगामध्ये निरपराध लोकंची हत्या पाकिस्तानकडून करण्यात आली. भारताने ऑपरेशन सिंदूरला परवानगी दिली आणि लष्कराने पाकिस्तानी ठिकाणांवर हल्ले केले.
- शहांनी ऑपरेशन महादेवबद्दल सभागृहाला माहिती दिली. ते म्हणाले, 28 जुलै रोजी ऑपरेशन महादेवमध्ये सुलेमान, फैजल अफगान आणि जिब्रान या तीन दहशतवाद्यांनी ठार केले. सुलेमान लष्करचा कमांडर होता. त्याचे अनेक पुरावे आहेत. अफगान आणि जिब्रान ए श्रेणीचे दहशतवादी होते. हे तिघेही पहलगामधील हल्ल्यातील दहशतवादी होते. या तिघांचा खात्मा करण्यात आला आहे.
- शहा म्हणाले, 23 एप्रिल रोजी संरक्षण विभागाची बैठक झाली. यामध्ये निर्णय करण्यात आला आकी, हल्लेखोर पाकिस्तानात पळून जाता कामा नये. याची आम्ही पूर्ण काळजी घेतली. 22 मे रोजी गुप्तचर संस्थांना इनपूट मिळाले की, दाचीगाम येथे दहशतवादी लपून बसले आहेत. या माहितीची अधिकृतता सिद्ध करण्यासाठी मे ते जुलैपर्यंत प्रयत्न करण्यात आले. भारतीय अधिकारी दहशतवाद्यांचे सिग्नल मिळवण्यासाठी त्या भागात फिरत राहिले. 22 मे रोजी आम्हाला सिग्नल मिळाले.
- दाचीगाम येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर 22 मे ते 22 जुलैपर्यंत त्यांचा शोध घेण्याचे काम सुरु होते. 22 जुलै रोजी सेंसरच्या माध्यमातून दहशवादी असल्याची पुष्टी मिळाली. पोलीस, भारतीय सेना यांच्या संयुक्त कारवाईत दहशतवाद्यांना घेरण्यात आले. 28 जुलै रोजी पहाटे 4. 46 वाजता त्यांना ठार करण्यात आले.
दोन महिने रेकी, पहाटे 4.46 वाजता…पहलगामच्या दहशतवाद्यांना कसे संपवले?
