- पुण्यातील खराडी येथील चर्चित रेव्ह पार्टी प्रकरणातील प्रमुख आरोपी डॉ. प्रांजल खेवलकरसह अन्य सहा जणांच्या घरांवर पुणे पोलिसांनी झडती घेतली आहे. यावेळी पोलिसांना कोणतेही अमली पदार्थ सापडले नाहीत. मात्र, तपासाच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी आरोपींच्या घरांमधून मोबाईल फोन्स, लॅपटॉप्स आणि मेमरी कार्ड्स जप्त केली आहेत.
- तपासात उघड झाल्याप्रमाणे या पार्टीसाठी व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून नियोजन झाले होते. पार्टीपूर्वी आरोपींनी एकमेकांशी सोशल मीडियाच्या चॅट्सद्वारे संवाद साधला होता. खराडीतील ‘बर्ड स्टे सूट’ येथे 25 ते 28 जुलैदरम्यान ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी सात आरोपींपैकी दोन जण प्रत्यक्ष उपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे.
- पोलिसांनी आरोपींच्या मोबाईल, लॅपटॉप आणि मेमरी कार्ड्सवरून सोशल मीडियावरील संवाद तपासण्यास सुरुवात केली आहे. यावरूनच पार्टीचे आयोजन कसे झाले, कोण कोण सहभागी होते आणि बाहेर कोणते नेटवर्क कार्यरत होते, याचा छडा लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. ड्रग्ज सापडले नसले तरी डिजिटल पुराव्यांमधून अनेक धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुणे रेव्ह पार्टीत मोठा ट्विस्ट!
